Uncategorized

पुणे पोलिस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली? कोंढव्यात बेकायदेशीर अवैद्य धंद्यांना आला ऊत

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:

कोंढवा, पुणे : (प्रतिनिधी)
कोंढवा परिसरात विविध प्रकारचे बेकायदेशीरअवैद्य धंदे सर्रास सुरू असून, याकडे स्थानिक पोलीस प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या भागात जुगार अड्डे, बेकायदेशीर देशी विदेशी दारू विक्री गुटखा मावा चरस गांजा तसेच लॉटरी सेंटरमध्ये चिमणी पाकोळी पणती व इतर आणि  मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय  चालू असून पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्रभर हॉटेल चालू असल्याने त्या भागात हॉटेलमध्ये सराईत गुन्हेगाराचा वावर जास्त प्रमाणात होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे आणि बेकायदेशीर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात उघडपणे चालू असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश. कुमार यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला होता की, “हद्दीतील बेकायदेशीर धंद्यांकडे दुर्लक्ष केल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल.” मात्र प्रत्यक्षात कोंढवा परिसरात या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. अवैध धंदे सुरू असतानाही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, प्रशासनच याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष तर करत नाही ना?

नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर पोलीस कर्मचाऱ्यांकडून ठोस कारवाई होत नाही, असे चित्र आहे. काही ठिकाणी केवळ नावापुरती कारवाई केली जाते, पण त्यामुळे या बेकायदेशीर व्यवसायांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याचा नागरिकांचा संशय आहे.

पुणे शहरात अन्य ठिकाणी विशेष मोहिमा राबवून कारवाई केली जात असताना, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र या मोहिमांचे परिणाम दिसून येत नाहीत, हे विशेष लक्षवेधी आहे. त्यामुळे “कोंढवा परिसरातील बेकायदेशीर धंद्यांना बळ देणारा कोण?” हा प्रश्न अधिक तीव्र होत आहे.

नागरिकांच्या मते, कोंढव्यातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात येण्याची चिन्हे दिसत असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या भागाकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा, प्रशासनाच्या निष्क्रियतेचा गैरफायदा घेत गुन्हेगारी प्रवृत्ती बळावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

कोंढवा, पुणे हे शहरातील दक्षिण भागातील वेगाने वाढणारे उपनगर आहे. येथे झपाट्याने वसाहती वाढत असतानाच काही बेकायदेशीर प्रवृत्तींची मुळे खोलवर जात असल्याची चिंता नागरिक व्यक्त करत आहेत.

कोंढवा परिसरात वाढते अवैध धंदे – वास्तवाचे धक्कादायक चित्र लवकरच उघड!

कोंढवा भागामध्ये सुरू असलेले अवैध धंदे, बेकायदेशीर जुगार अड्डे आणि अन्य गुन्हेगारी स्वरूपाच्या ठिकाणांची वास्तविक स्थिती लवकरच आपल्यासमोर फोटोसह मांडणार आहोत…
पुढील बातमीत वाचा…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button