Uncategorized

पुण्यात बनावट नोटांचा पर्दाफाश – महिलांच्या मदतीनं रॅकेट, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा वापर

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा

पुणे | शिवाजीनगर: पुणे शहरात बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवाजीनगर पोलिसांच्या सायबर पथकाने केलेल्या कारवाईत दोन महिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींकडून खऱ्या नोटांच्या बदल्यात हुबेहूब बनावट नोटा दिल्या जात होत्या. उदाहरणार्थ, १ लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात २ लाखांच्या बनावट नोटा दिल्या जात. या नोटांची गुणवत्ता इतकी जास्त होती की सामान्य लोक तर दूरच, बँक कर्मचाऱ्यांना देखील त्या बनावट असल्याचे कळत नव्हते.

आरोपींमध्ये दोन महिला विशेषतः सक्रीय होत्या आणि त्या विश्वास संपादन करून नोटा देण्याचं काम करत असत. या नेटवर्कमध्ये इंजिनिअरिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा वापर करून नोटा तयार करण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या मुलांना तांत्रिक कौशल्याचा गैरवापर करून नोटा प्रिंट व डिझाइन करण्याचे काम दिले जात होते.

शिवाजीनगर सायबर पथकाने अचूक माहितीवरून सापळा रचत ही मोठी कारवाई केली. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे हे रॅकेट उघडकीस आलं असून, यामागे आणखी मोठे नेटवर्क असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सध्या आरोपींविरोधात भारतीय दंड विधान व चलन अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि तपास अधिक खोलात सुरू आहे.

सावधान! नागरिकांनी चलन व्यवहार करताना नोटांची नीट पडताळणी करावी, अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे.

संपादक विजयसिंह गायकवाड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button