Uncategorized

उघड्यावर घनकचरा टाकण्यास विरोध केल्याने ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर सुरज गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी; ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा

पुणे हडपसर – पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर सुरज गायकवाड यांनी उघड्यावर बिनप्रक्रिया घनकचरा टाकण्यास विरोध केल्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात संबंधितांवर फुरसुंगी पोलीस ठाण्यात ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज गायकवाड यांनी परिसरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या कचरावाहतूक वाहनांना विरोध केला होता. या वेळी डंपर चालकाने गायकवाड यांच्या अंगावर कचऱ्याने भरलेले वाहन घालण्याचा प्रयत्न केला. तसेच, आरोपींनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि जातीवाचक शिवीगाळ केली.

या घटनेत आरोपी वाहनमालक अरबाज सय्यद, आणि त्याचा भाऊ तसेच संतोष हरपळे आणि अन्य दोन अनोळखी इसम सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. सुरज गायकवाड यांनी या प्रकाराचा फेसबुक लाईव्हद्वारे पर्दाफाश केला आणि संपूर्ण घटना जनतेसमोर आणली.

यानंतर गायकवाड यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार, आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 352, 351(2), 3(5) तसेच अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत कलम 3(1)(r) व 3(1)(s) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारा दबाव व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असून, प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक स्तरावरून करण्यात येत आहे.

संपादक: विजयसिंह गायकवाड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button