पोलीसांची धडाकेबाज कारवाई – गावठी पिस्तूल व काडतूस घेऊन फिरणारा युवक शनिवार वाडा परिसरात जेरबंद!

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
पुणे,(प्रतिनिधी) दि. १८ एप्रिल २०२५ – शनिवार वाडा परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर गावठी पिस्तूल आणि काडतूस घेऊन फिरणाऱ्या तरुणाला विश्रामबाग पोलीस तपास पथकाने अचूक माहितीच्या आधारे ताब्यात घेतले. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हालचालींना मोठा धक्का बसला आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अनिस शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शनिवार पेठेतील फुटका बुरुज, शनिवार वाडा परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित इसम आकाश दशरथ घोणे (वय ३०, व्यवसाय – मटन विक्रेता, रा. भवानी पेठ, पुणे) याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडे सुमारे ५०,०००/- रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे करीत आहेत.
ही धडाकेबाज कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त संदिपसिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत श्रीमती विजयमाला पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), अरुण घोडके (पोलीस निरीक्षक गुन्हे), मनोज बरुरे (पोलीस उपनिरीक्षक), तसेच पोलीस अंमलदार अशोक माने, मयुर भोसले, सचिन कदम, सचिन अहिवळे, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, अनिस शेख, साताप्पा पाटील, नितीन बाबर व सागर मोरे यांनी सक्रिय सहभाग घेतला.