Uncategorized

पुण्यात आलिशान कारमधून 28 किलो गांजा जप्त; पाच जण गजाआड

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:

पुणे: मुंढवा परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत 28 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असून, एकूण 16 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा-कोरेगाव पार्क रोडवर रात्री गस्त घालत असताना लाल रंगाची हुंडाई आय 20 कार संशयास्पद स्थितीत आढळली. गाडीची तपासणी केली असता डिक्कीत दोन पोत्यांमध्ये 28 किलो गांजा सापडला.

अटक करण्यात आलेले आरोपी आहेत – प्रमोद कांबळे (वय 44, सोलापूर), विशाल पारखे (वय 41, पुणे), गणेश भगत (सातारा), विकी कांबळे (बारामती) आणि प्रतिक पवार (बारामती). चौकशी दरम्यान, त्यांनी हा गांजा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.

यानंतर पोलिसांनी फुरसुंगी येथे जाऊन उर्वरित आरोपींनाही ताब्यात घेतले. या कारवाईत 28 किलो गांजा (किंमत 5 लाख 60 हजार रुपये), तीन मोबाईल (1 लाख 20 हजार रुपये), आणि आलिशान कार (10 लाख रुपये) असा एकूण 16.80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button