Uncategorized

बिल्डर लॉबीचा वरदहस्त? पुणे महापालिकेतील बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचारावर बेमुदत धरणे आंदोलन!”

अभियंता आणि बिल्डरचा घोटाळा, पुण्यात बेकायदेशीर दिलेल्या भोगवटा प्रमाणपत्रांचा वादळ"

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा :

पुणे महापालिकेतील बांधकाम विकास विभाग झोन क्र-2 या  विभागात भ्रष्टाचाराचा स्फोट!  रिपब्लिकन परिवर्तन सेनेचे धडक आंदोलन”

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र-2 या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून, नियमांचे सर्रास उल्लंघन करून “पार्ट कम्प्लिशन सर्टिफिकेट”(भोगवटा प्रमाणपत्र) वाटप केले जात असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन परिवर्तन सेनेने केला आहे. या भ्रष्टाचारात थेट उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा दावा संघटनेने केला असून, 21 फेब्रुवारी 2025 रोजी महापालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

रिपब्लिकन परिवर्तन सेनेचे प्रदेशाध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी सांगितले की, महापालिकेतील बांधकाम विकास विभाग झोन क्र – 2 या विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता विलास नेवाळी, आणि  उपअभियंता राजेश खाडे तसेच कनिष्ठ अभियंता विक्रम क्षीरसागर यांनी मोठ्या बिल्डर लॉबीशी संगनमत करून नियम धाब्यावर बसवले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार न करता अनधिकृत व अपूर्ण इमारतींना बेकायदेशीर प्रमाणपत्रे देण्यात आली, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्यांचे बिल्डर लॉबीशी संगनमत
संघटनेच्या म्हणण्यानुसार, हे अधिकारी बिल्डर लॉबीच्या दबावाखाली काम करत असून, कोणतीही योग्य तपासणी न करता मोठमोठ्या प्रकल्पांना बेकायदेशीररित्या मंजुरी देत आहेत. परिणामी, नागरिकांना धोकादायक इमारतींमध्ये राहण्यास भाग पाडले जात आहे.

रिपब्लिकन परिवर्तन सेनेने 10 फेब्रुवारी 202४ रोजी प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते. मात्र, महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने आता संघटनेने थेट आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.

“जर दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई झाली नाही, तर पुणे शहरात ऐतिहासिक आंदोलन छेडले जाईल आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना तोंड लपवण्यास जागा मिळणार नाही,” असा कठोर इशारा रिपब्लिकन परिवर्तन सेनेने दिला आहे.

या आंदोलनामुळे पुण्यातील भ्रष्टाचाराला आळा बसेल का? प्रशासन काय भूमिका घेणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button