Uncategorized

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी कडून निलेश आल्हाट निवडणुकीच्या रिंगणात

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजित आंबेडकर यांच्या उपस्थितीत दिली उमेदवारी

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा

[प्रतिनिधी: शुभम जगताप]

पुणे कॅन्टोन्मेंट अनुसूचित जाती जमाती या राखीव मतदार संघामध्ये वंचित बहुजन आघाडीने निलेश आल्हाट यांना उमेदवारी  दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत  निलेश आल्हाट हे निष्ठावंत आणि तरुण तडफदार युवा नेतृत्व असून वंचित बहुजन आघाडी या पक्षाने त्यांना पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघांमध्ये उमेदवारीची संधी  दिली आहे.

आल्हाट हे सामाजिक कामात  सक्रिय असतात. पुणे शहरातील सामान्य गोरगरीब नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात  कॅन्टोन्मेंट मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीने तगडा उमेदवार दिल्याने इतर पक्षाच्या उमेदवारापुढे एक मोठे आव्हान उभे  राहिले आहे त्यामुळे या मतदारसंघात सर्वांचे लक्ष लागून आहे

निलेश अल्हाट यांना वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून उमेदवारी दिल्याने आंबेडकरी चळवळीमध्ये पुणे शहर जिल्हा मध्ये नव चैतन्य निर्माण केले आहे

या मतदारसंघांमध्ये अनुसूचित जाती जमाती मधील बौद्ध समाजाचे सर्वांधीक मतदार आहेत कॅन्टोन्मेंट मतदार संघातील स्थानिक उमेदवार म्हणून आल्हाट यांच्याकडे पाहिले जाईल व कॅन्टोन्मेंट मधील सर्व जाती धर्मातील तरुणाई निलेश आल्हाट यांना उमेदवारी दिल्याने प्रचंड उत्साही व आनंदी आहेत

निलेश आल्हाट तरुण तडफदार उमेदवार असल्याने कॅन्टोन्मेंट च्या तरुणाई मध्ये जल्लोषाच वातावरण दिसत आहे दिपसागर प्रतिनीधी च्या सर्वे नुसार जनतेच्या मनातील आमदार म्हणून निलेश आल्हाट यांना प्रचंड पसंती आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button