Uncategorized

अखेर पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातचा तिढा सुटला सुनील टिंगरे हेच उमेदवार आज झाली घोषणा

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा :

पुणे -अखेर पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातचा तिढा सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वडगाव शेरीचे विद्यमान आमदार यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आमि माजी आमदार जगदीश मुळीक देखील आग्रही होते, तर मुळीक यांना भाजप श्रेष्ठींनी शब्द दिल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं, त्यानंतर आज सकाळी पत्रकार परिषदेवेळी सुनील टिंगरे यांच्या नावाची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली, त्यानंतर आता मुळीकांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दुसऱ्या यादीत उमेदवारी जाहीर
तासगाव कवठे-महाकाळ : संजय काका पाटील

अणुशक्तीनगर : सना मलिक
इस्लामपूर : निशिकांत पाटील
लोहा कंधार : प्रतापराव चिखलीकर
वांद्रे पूर्व : झिशान सिद्धकी
वडगाव शेरी : सुनिल टिंगरे
शिरुर : ज्ञानेश्वर कटके

येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माननीय उपमुख्यमंत्री आणि माझे मार्गदर्शक अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील टिंगरे, माननीय मुख्यमंत्री   एकनाथ संभाजी शिंदे , माननीय उप मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, महायुती मध्ये सहभागी असणारे सर्व घटक पक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, आणि माझ्या परिसरातले सर्व हितचिंतक, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक या सर्वांचे आभार मानून मी या उमेदवारीच्या संधीचा स्वीकार करतो.-आमदार सुनील टिंगरे

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button