Uncategorized

आर्थिक फसवणूक झाल्यामुळे व्यापाऱ्याची आत्महत्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दिपसागर ऑनलाइन न्यूज पोर्टल सेवा:

पुणे, : आर्थिक व्यवहारात फसवणूक झाल्यामुळे एका व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमजान अली साचे (वय ४४, रा. भवानी पेठ) असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी रमजान यांच्या पत्नीने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सुनील बेले, अफसर शेख, मतीन शेख, हैदर शेख, असिफ, मुजम्मिल पटवेकर, संजीव बजारमठ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमजान साचे यांचा कपड्यांचा व्यवसाय होता. त्यांना व्यवसायात गुंतवणूक केल्यास जास्त फायदा करून देतो, असे सांगून आरोपींनी मोठी रक्कम घेतली. रमजान यांनी बँकेतून कर्ज घेऊन पैसे दिले होते. परंतु आरोपींनी पैसे परत केले नाहीत. त्यामुळे रमजान यांनी १४ ऑक्टोबर रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. रमजान यांच्या पत्नीने २१ ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी सातजणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक कुलदीप व्हटकर करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button