बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या पुणे शहर अध्यक्ष पदी गणेश चव्हाण यांची निवड
भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय चेअरमन व ट्रस्टी ॲड सुभाष जैंजाळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन केली निवड

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा :
पुणे गुलटेकडी : बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध ) च्या पुणे शहर अध्यक्षपदी गणेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून गणेश चव्हाण हे शिवराय शाहू -फुले -आंबेडकर चळवळीतील निष्ठावंत प्रमाणिक सक्षम सामाजिक कार्यकर्ते आहेत.
चव्हाण यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी आतापर्यंत सामाजिक धार्मिक आरोग्य कला क्रीडा इत्यादी क्षेत्रात समाज उपयोगी उल्लेखनीय कार्य करून सामाजिक बांधिलकी पार पडले आहे
त्यांनी केलेल्या सामाजिक कामाची दखल घेऊन बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) चे राष्ट्रीय चेअरमन व ट्रस्टी ॲड सुभाष जैंजाळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन गणेश चव्हाण यांची पुणे शहर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि पुणे शहराची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली
या वेळी भारत बहुजन ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ भालेराव यांनी गणेश चव्हाण यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच जय भिम तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष रुपेशभाऊ सरोदे यांनी देखील चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी तक्षशिल बुद्ध विहाराचे सर्व सभासद उपस्थित होते