पुणे शहर पोलीस दलात 12 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; काहींची महिन्याभरात दुसऱ्यांदा बदली

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा
पुणे:- |शहर पोलीस दलात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. एकूण १२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून, काही अधिकाऱ्यांची अवघ्या महिनाभरात पुन्हा एकदा बदली झाली आहे. विशेष म्हणजे, यावेळी चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नियुक्ती वाहतूक शाखेत करण्यात आली आहे.
बदल्यांनुसार, पुढीलप्रमाणे नवीन नेमणुका करण्यात आल्या आहेत:
संतोष पांढरे – गुन्हे शाखा येथून विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वपोनि
विठ्ठल पवार – गुन्हे (उत्तमनगर) येथून सहकारनगर पोलीस ठाण्याचे वपोनि
यशवंत निकम – सायबर सेलमधून स्वारगेट पोलीस ठाण्याचे वपोनि
उत्तम भजनावळे – गुन्हे (सिंहगड रोड) येथून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वपोनि
विक्रमसिंग कदम – गुन्हे (कोथरुड) येथून खडकी पोलीस ठाण्याचे वपोनि
दिलीप फुलपगारे – खडकीचे वपोनि पद सोडून वाहतूक शाखेत नियुक्त
विजयमाला पवार – विश्रामबाग वपोनि पदावरून वाहतूक शाखेत नियुक्त
राहुल गौड – सहकारनगर वपोनि पदावरून वाहतूक शाखेत नियुक्त
युवराज नांद्रे – स्वारगेट वपोनि पदावरून वाहतूक शाखेत नियुक्त
उल्हास कदम – चतु:श्रृंगी वपोनि पदावरून गुन्हे, सिंहगड रोड
जितेंद्र कदम – गुन्हे (भारती विद्यापीठ) येथून गुन्हे, विश्रामबाग
दत्ताराम बागवे – गुन्हे (खडकी) येथून गुन्हे, विश्रांतवाडी
याशिवाय, मुंबई लोहमार्ग पोलीस दलातून पुण्यात बदली झालेल्या निरीक्षक अलका सरग यांची ‘बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हे विभाग प्रमुख’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
या बदल्यांमुळे पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रशासनिक हालचालींना गती मिळणार असून, नवीन नेमणुकांमुळे कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत नवे परिवर्तन अपेक्षित आहे.