शाहू विचारांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न — गौतम पायाळे सरांच्या पुढाकारातून”
शाहू महाराज जयंतीनिमित्त पुण्यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; पायाळे सरांच्या वाढदिवसाचे औचित्य

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
प्रतिनिधी, पुणे
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पुणे महानगर संस्कार सचिव आयुष्यमान गौतमजी पायाळे सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, एथेल गार्डन अध्यापक विद्यालय येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर यांसारख्या शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शिक्षण हा मुलभूत हक्क असून, शाहू महाराजांनी दिलेल्या सामाजिक न्यायाच्या विचारांना पुढे नेत, हा उपक्रम म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून समतेचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम ठरला.
या कार्यक्रमावेळी पुणे महानगर संघटक आयुष्यमान माणिक लोंढे, वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक आयुष्यमान सतीश भाऊ साबळे, नितीन भाऊ साठे, लक्ष्मण भाऊ कदम, संजयजी साबळे, तसेच विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी आयुष्यमान पायाळे सरांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि अशा उपक्रमांनी समाजात शिक्षणाबाबत जागरूकता वाढत असल्याचे मत व्यक्त केले.
हा उपक्रम म्हणजे शाहू महाराजांच्या विचारांचा प्रत्यक्ष कृतीशील अविष्कार होता.