Uncategorized

भुलेश्वर घाटात अर्धवट जळालेल्या अवस्थेत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला; खून करून मृतदेह पेटविल्याचा संशय

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:

प्रतिनिधी | यवत, ता. दौंड, जि. पुणे
यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भुलेश्वर घाट परिसरात दिनांक २७ जून २०२५ रोजी एक अनोळखी पुरुषाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात खून करून मृतदेह पेटवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवत-भुलेश्वर रस्त्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावर, शेरू रिसॉर्टकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याजवळ, अंदाजे वय ३० ते ३५ वर्षांच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला. यवत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, डोक्यावर, छातीवर आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार केल्याचे तसेच मृतदेह पेटवण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी पोलीस हवालदार विनायक हाके (ब.नं. १९७४) यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 103(1), 238 अन्वये यवत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५५३/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. महेश माने करीत आहेत.

अनोळखी मृत व्यक्तीचे वर्णन :

वय: अंदाजे ३० ते ३५ वर्षे

उंची: सुमारे ५ फूट ५ इंच

शरीरयष्टी: सडपातळ

चेहरा: उभट

केस: काळे

वेषभूषा: अर्धवट जळालेल्या अवस्थेत लाल-पांढऱ्या रंगाचा चौकडीचा शर्ट

पादत्राणे: तपकिरी रंगाचे लेदरचे सॅन्डल – समोर नक्षीकाम, तळवा काळा

पोलीस प्रशासनाचा नागरिकांना आवाहन:

सदर मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणात कोणी काही माहिती देऊ इच्छित असेल, किंवा सदर मयताबद्दल काही माहिती असेल, तर तात्काळ खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. संपर्ककर्त्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.

📞 श्री. नारायण देशमुख
पोलीस निरीक्षक, यवत पोलीस स्टेशन
मो. ९९६७४३६३३३

📞 श्री. महेश माने
सहायक पोलीस निरीक्षक, यवत पोलीस स्टेशन
मो. ८१४९७२९५६५

📞 यवत पोलीस स्टेशन दूरध्वनी क्र.: ०२११९-२९८१३३

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button