रक्ताच्या प्रत्येक थेंबातून… शहिदांना सलाम! वंचित बहुजन आघाडी, पुणे शहराचं समाजप्रेरित पाऊल

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा
पुणे शहर- जिथे स्मृती अमर आहेत, तिथे उपक्रमही असामान्य असतात.
वंचित बहुजन आघाडी, पुणे शहराच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात एक विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरते मर्यादित न राहता, हे आयोजन पाहालगम येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना व भारत-पाक युद्धातील शूरवीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित होते.
शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात तब्बल ३२ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजप्रती आपली बांधिलकी जपली.
या उपक्रमात प्रमुख कार्यकर्ते भारतभूषण कोल्हे
राजाभाऊ ढाले उपाध्यक्ष सतीश साबळे संघटक
जितेश सरोदे सह प्रसिद्धी प्रमुख तोहसीफ पठाण प्रवती विधानसभा महासचिव बबन धिवार समता सैनिक अनिल साळवे राजु गुळवे अमोल मंचक मोरे जितेंद्र गौतम बगाडे प्रमोद खंडारे डॉ धनंजय कदम
मिलिंद सरोदे विशाल वंजारे मोहन गाडेकर सह अनेक नागरिकांनी रक्तदान केले त्यावेळी . युवानेते मा. सुजात दादा आंबेडकर यांनी स्वत: उपस्थित राहून प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला – हा केवळ सन्मान नव्हता, तर कृतज्ञतेचा स्पर्श होता.
या प्रेरणादायी क्षणी अनेक कार्यकर्ते व नागरिकांनी मनापासून सहभाग नोंदवला.
“रक्तदान म्हणजे केवळ जीवनदान नव्हे, तर देशभक्तीची प्रत्यक्ष अभिव्यक्ती!”
या उपक्रमाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा सिद्ध केलं – समाजकार्य ही आमची ओळख आहे आणि शहिदांविषयीची कृतज्ञता आमचं कर्तव्य!
संपादक:- विजयसिंह गायकवाड