Uncategorized

10 एकर जमीन घोटाळा : वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा, पुणे पोलिस दलात खळबळ

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा

पुणे: पुणे शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, कारण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यावरच थेट फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोली येथील तब्बल 10 एकर जमीन बेकायदेशीररित्या हडपण्यासाठी संगनमत, बनावट कागदपत्रं आणि खोट्या ओळखीचा वापर करून, बनावट महिला मालकिणी दाखवून जमिनीवर कब्जा करण्याचा प्रकार उघड झाला आहे.

ही कारवाई चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यावर आणि त्यांच्या सहकार्‍यांवर करण्यात आली आहे. आरोपींच्या यादीत आनंद लालासाहेब भगत, शैलेश सदाशिव ठोंबरे आणि अपर्णा यशपाल वर्मा यांचाही समावेश आहे. या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता,(BNS) 2023 या कायद्याअंतर्गत गंभीर फसवणूक आणि फौजदारी कटाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलिस अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करत बांधकाम व्यावसायिकांशी संगनमत करून जमिनीच्या मूळ मालकाच्या नावावर बनावट महिला उभी केली, तिच्या नावाने खोटे कागदपत्र तयार करून जमिनीवर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला. यासाठी बनावट कागदपत्रांची निर्मिती, आर्थिक व्यवहार, आणि प्रभावशाली संपर्क वापरण्यात आले.

या प्रकरणात पोलिस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून, शहरात संतापाची लाट उसळली आहे. पुणे पोलिसांनी तपासासाठी विशेष पथक नेमले असून, पारदर्शक तपासाचे आश्वासन देण्यात आले आहे.

पोलीस दलात भ्रष्टाचाराचा पुन्हा उघड झालेला चेहरा

गुन्ह्याच्या तपासात अजूनही अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता असून, यामध्ये बड्या बिल्डर लॉबीच्या सहभागाचाही संशय व्यक्त केला जात आहे. गजा मारणे प्रकरणानंतर पुन्हा एकदा पोलिस आणि गुन्हेगारी यांचं संगनमत उघड झाल्याने, जनतेमध्ये पोलिस यंत्रणेवरचा विश्वास डळमळीत झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button