Uncategorized

चोरीच्या वाहनांसह दोघे अटकेत, दोघांचा अपघाती मृत्यू – मुंढवा पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा

पुणे,-(प्रतिनिधी) दि. 20 एप्रिल 2025 – पुणे शहर व परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मुंढवा पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन चोरटे अपघातात ठार झाले असून, दोन इसमांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एकूण 3.09 लाख रुपये किमतीच्या पाच चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या असून पाच गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले आहे.

मुंढवा पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत डी.बी. पथकाचे पोलीस अंमलदार शिवाजी जाधव व योगेश राऊत यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार, YAMAHA R15 दुचाकीसह दोन इसम चोरीचा वाहन विक्रीसाठी हडपसर रेल्वे स्टेशन जवळ येणार होते. सदर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांना कळवून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दोघा इसमांना वाहनासह ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून करण्यात आलेल्या चौकशीत त्यांनी आपली नावे –

1. रामेश्वर अंकुश धनगर (वय 27, रा. पैठण, संभाजीनगर)

2. जलाल हनीफ शेख (वय 23, रा. जोगेश्वरी, संभाजीनगर) – अशी सांगितली.

तपासादरम्यान त्यांनी केशवनगर येथून वाहन चोरी केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यातील त्यांच्या अन्य साथीदारांनी दुसरी दुचाकी घेऊन पळ काढताना अहमदनगर-पुणे महामार्गावर अपघात होऊन मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली. याबाबत अहमदनगर तालुका पोलीस स्टेशन येथे अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.

या प्रकरणात एकूण पाच मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून, खालील गुन्हे उघडकीस आले आहेत:

1. मुंढवा पो.स्टे. गु.र.नं. 93/2025 – BNS कलम 303(2)

2. मुंढवा पो.स्टे. गु.र.नं. 94/2025 – BNS कलम 303(2)

3. मुंढवा पो.स्टे. गु.र.नं. 105/2025 – BNS कलम 303(2)

4. मुंढवा पो.स्टे. गु.र.नं. 304/2024 – IPC कलम 379

5. सातारा पो.स्टे. (छत्रपती संभाजीनगर) गु.र.नं. 119/2025 – BNS कलम 303(2)

रामेश्वर धनगर याच्यावर यापूर्वीही पुणे शहर, पुणे ग्रामीण, पैठण व बीड येथे वाहनचोरीचे १५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त (झोन 5) श्री. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप, गुन्हे निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, अंमलदार योगेश गायकवाड, शिवाजी जाधव, राहुल मोरे, विनोद साळुंके व योगेश राऊत यांनी पार पाडली आहे.

संपादक:- विजयसिंह गायकवाड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button