Uncategorized

पुणे | गाडी मागे घेण्याच्या वादातून गुलटेकडीत राडा! कोयते, लाकडी बांबूंचा माजला हैदोस; चौघे गंभीर, १४ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा;

पुणे गुलटेकडी – धुलवडीच्या दिवशी गुलटेकडी येथील मिनाताई ठाकरे वसाहतीत गाडी मागे घेण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. लोखंडी हत्यारे, लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्यांनी झालेल्या या मारहाणीत चौघे गंभीर जखमी झाले आहेत. स्वारगेट पोलिसांनी दोन्ही गटांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी केशव अनिल शिवशरण (वय २०, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रोहित गंबीर सिंग (वय २८, रा. मिनाताई ठाकरे वसाहत) आणि त्याच्या पाच साथीदारांनी त्यांच्यावर कोयते, लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात राहुल ढोणे आणि अक्षय कांबळे गंभीर जखमी झाले. आरोपींनी “आमच्या वाट्याला कोणी गेले, तर त्याचा हाच परिणाम होईल,” अशी धमकी देत परिसरात दहशत माजवली.

दुसऱ्या बाजूने, रोहित सिंगनेही स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सागर कदम व आठ जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात दर्शन सुतार व संदेश मेश्राम गंभीर जखमी झाले. फिर्यादी आणि त्यांचे मित्र थांबलेले असताना, “सचिन माने सोबत का फिरतोस?” असा जाब विचारत त्यांच्यावर धारदार शस्त्रे, ब्लॉक, फरशी, लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी बांबूने हल्ला करण्यात आला.

या घटनेने गुलटेकडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबिकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button