Uncategorized

लोणी काळभोर परिसरात अफूची बेकायदेशीर लागवड; पोलिसांचा छापा, महिला अटकेत

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा ;

लोणी काळभोर परिसरात अफूची बेकायदेशीर लागवड; पोलिसांचा छापा, महिला अटकेत

पुणे: लोणी काळभोर परिसरातील म्हातोबाची आळंदी येथे एका शेतात अफूची बेकायदेशीर लागवड सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून ६६ अफूच्या झाडांसह संशयित महिलेला ताब्यात घेतले.

याप्रकरणी मंगल दादासाहेब जावळकर (वय ४५, रा. म्हातोबाची आळंदी) हिला अटक करण्यात आली असून, तिच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची धडक कारवाई
पुणे-सोलापूर महामार्गाजवळील जगताप मळा रस्त्यावर संशयित महिलेच्या शेतात अफूची ६६ झाडे लावल्याची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलिसांनी पंचासमक्ष कारवाई केली.

ही कारवाई परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे आणि त्यांच्या पथकाने केली.

लोणी काळभोर परिसरात अवैध लागवडीसाठी कडक कारवाईचा इशारा

गेल्या काही महिन्यांत लोणी काळभोर परिसरात अफू आणि अन्य अमली पदार्थांची बेकायदेशीर लागवड झाल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button