Uncategorized

बँक ऑफ महाराष्ट्रचा फुटपाथवर कब्जा – नागरिक रस्त्यावर चालायला मजबूर!

बँक ऑफ महाराष्ट्रनेच अडवला पादचाऱ्यांचा रस्ता? नागरिकांची गैरसोय!

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा

पुणे शिवाजीनगर : सामान्य हातगाडीवाले किंवा फेरीवाले फुटपाथवर उभे राहिले, तर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय अतिक्रम विभागा तातडीने कारवाई करते. मात्र, बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रधान (लोकमंगल) शिवाजीनगर येथिल मुख कार्यालयाबाहेर अनधिकृत बॅरिगेट्स बसवून फुटपाथ अडवला तरी घोले क्षेत्रीय कार्यालय अतिक्रम विभाग हे डोळेझाक करत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

घोले रोड क्षेत्रीय कार्यालय अतिक्रम विभागाकडून लहानांना करडी नजर, बड्यांना सूट?

रोजच्या कमाईसाठी हातगाडी लावणाऱ्या गरीब विक्रेत्यांवर पुणे महानगरपालिका अतिक्रम विभाग झडप घालते. त्यांचे सामान जप्त करून, दंड ठोठावला जातो. पण बँक ऑफ महाराष्ट्रसारख्या बड्या संस्थेनेच नियम तोडले, तरी घोले रोड क्षेत्रीय कार्यालय अतिक्रम विभागचे अधिकारी गप्प का? हा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

फुटपाथ कोणासाठी? बँकसाठी की नागरिकांसाठी?

फुटपाथ हा पादचाऱ्यांसाठी असतो. मात्र, बँक ऑफ महाराष्ट्रने बॅरिगेट लावून संपूर्ण जागा अडवली आहे. आधीच मेट्रोचे काम सुरू असल्याने येथे रहदारी मोठी आहे. त्यातच बँकेने फुटपाथ रोखल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. घोले रोड क्षेत्रीय कार्यालय अतिक्रम विभाग यांच्याकडून लहान विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई केली जाते, पण बँक प्रशासनाकडे कानाडोळा का करते?

अपघात झाला तर जबाबदार कोण?

या भागातून मोठ्या प्रमाणावर लोक ये-जा करतात. रात्रीच्या वेळी प्रवासी थांबतात. रस्ता अरुंद असल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. भविष्यात कुणाचा जीव गेला तर जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

घुले रोड क्षेत्रीय कार्यालय अतिक्रम विभागाचे अधिकारीच्या कधी जागं येणार ?

नागरिकांनी पुणे महानगरपालिकेकडे मागणी केली आहे की, बँक प्रशासनावर तातडीने कारवाई करून फुटपाथ मोकळा करण्यात यावा. अन्यथा घुले रोड क्षेत्रीय कार्यालय अतिक्रम विभागाच्या दुजाभावाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन परिवर्तन सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

बड्या संस्थांसाठी मोकळे नियम?

घोले रोड क्षेत्रीय कार्यालय अतिक्रम विभागाने नियम सर्वांसाठी समान ठेवावेत. हातावर पोट असणाऱ्या गरीब विक्रेत्यांना हटवता, मग बँकेला सवलत का? नागरिकांची ही रास्त मागणी घोले रोड क्षेत्रीय कार्यालय अतिक्रम विभागाचे अधिकारी कधी ऐकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button