Uncategorized

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना ब्लॅंकेट वाटप

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा :

पुणे : deepsagar news || खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (शिंदे गट) तर्फे महात्मा फुले गंज पेठ येथे गरजू महिलांना मोफत ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन शिवसेना शिंदे गटाचे कसबा विधानसभा प्रमुख निलेश जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

कार्यक्रमात पुणे शहर कामगार सेनेचे अध्यक्ष सुधीर कुरुमकर आणि पुणे शहर जिल्हा शिक्षक शिक्षकेतर संघाचे प्रमुख अनिल गडकरी सर यांच्या हस्ते ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना पुणे शहर वैद्यकीय मदत प्रमुख अजय सपकाळ, शहर समन्वयक नवनाथ निवंगुणे, आकाश गायकवाड, अतुल कच्छावे, संतोष कांबळे, रवी शिंदे, जयसिंग कसबे, चंदन धुमाळ, सागर घोलप यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या समाजोपयोगी उपक्रमामुळे स्थानिक गरजू नागरिकांना मदतीचा हात मिळाला असून, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.

संपादक: विजयसिंह गायकवाड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button