ॲड हेमंत झंजाड यांचा पुणे बार असोसिएशन अध्यक्षपदी निवडीनंतर भव्य सत्कार सोहळा

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा:
पुणे: पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड हेमंत झंजाड सर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ऍड. अरविंद मधुकर तायडे यांनी विशेष सन्मान करून त्यांचे अभिनंदन केले व भावी कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. पुणे बार असोसिएशनच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ॲड. हेमंत झंजाड यांनी आपल्या भाषणात न्यायसंस्थेतील पारदर्शकता, वकिलांच्या हितसंबंधांचे संरक्षण आणि न्यायालयीन प्रक्रियांमध्ये अधिक गतीमानता आणण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुण्यातील वरिष्ठ वकील, कायदेतज्ज्ञ तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी ॲड. हेमंत झंजाड यांचे अभिनंदन केले. त्यांच्या निवडीमुळे पुणे बार असोसिएशनला एक सक्षम आणि अनुभवसंपन्न नेतृत्व मिळाल्याचे वक्त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमात पुण्यातील अनेक प्रतिष्ठित वकिल, कायदे क्षेत्रातील अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर संघटक सतिश साबळे तसेच पुणे शहर सहसचिव माणीक लोंढे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
संपादक : विजयसिंह गायकवाड.