Uncategorized

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी संघर्ष तीव्र; निर्णय न घेतल्यास दलित संघटनांचा उग्र आंदोलनाचा इशारा”

"डॉ. आंबेडकर स्मारकासाठी दलित संघटनांचा एल्गार; लवकर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन"

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा :

पुणे शहर : deepsagar news || मालधक्का चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व स्मारक उभारणीसाठी जागा निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे. सामाजिक संघटना, राजकीय नेते आणि नागरिकांनी या मागणीसाठी एकत्र येत सरकारवर त्वरित निर्णय घेण्याचा दबाव टाकला आहे. शासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात शिलार रतनगिरी (अध्यक्ष, पुणे शहर भीमशक्ती सामाजिक संघटना), विजयसिंह गायकवाड (प्रदेशाध्यक्ष, रिपब्लिकन परिवर्तन सेना), विजयभाई जगताप (संस्थापक अध्यक्ष, मास मुव्हमेंट संघटना), संजय दामोदरे (शहर संघटक सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), अर्जुनभाऊ ओव्हाळ (संस्थापक अध्यक्ष, क्रांती मजदूर सेना), नामदेवभाऊ घोरपडे (संस्थापक अध्यक्ष, बहुउद्देशीय कामगार संघटना) तसेच युवा नेतृत्व शुभमभाऊ जगताप व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. आंबेडकर स्मारक हा सामाजिक प्रेरणास्थळाचा केंद्रबिंदू

स्मारक उभारणीसाठी जागेच्या मागणीला विलंब होत असल्याने अनुयायांमध्ये तीव्र संताप आहे. सामाजिक चळवळीतील नेत्यांनी स्पष्ट केले की, “पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ऐतिहासिक वारसा कायम ठेवण्यासाठी हे स्मारक आवश्यक आहे. ही केवळ वास्तू नव्हे, तर सामाजिक प्रेरणास्थळ असेल.”

स्मारकाचा प्रश्न लांबणीवर टाकल्यास डॉ. आंबेडकर अनुयायी तीव्र आंदोलन करतील, असा स्पष्ट इशारा देत, सर्व स्तरांवर संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असेही आंदोलकांनी ठामपणे सांगितले.

संपादक विजयसिंह गायकवाड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button