वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या हडपसर विधानसभा अध्यक्षपदी विशाल वंजारे यांची निवड
हडपसर विधानसभा माथाडी युनियनच्या नेतृत्वाची धुरा विशाल वंजारे यांच्याकडे"

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा
पुणे: हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या अध्यक्षपदी विशाल वंजारे यांची निवड करण्यात आली आहे. युनियनचे पुणे शहराध्यक्ष मा. श्री विशाल कसबे व वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस धर्मराज लांडगे, मिलिंद सरवदे, बाबूभाई पठाण, सचिन भडकवाड, सुमित हातागळे, आणि राकेश यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
विशाल वंजारे यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. नियुक्तीनंतर बोलताना विशाल वंजारे म्हणाले की, “माथाडी कामगारांच्या संघटन बांधणीसाठी व पक्ष प्रचारासाठी मी निष्ठेने काम करेन.”
विशाल वंजारे यांच्या नेतृत्वाखाली माथाडी युनियनची संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास राकेश पवार सर्व मान्यवरांनी व्यक्त केला आहे.
संपादक: विजयसिंह गायकवाड