Uncategorized

आयकॉन युवा नेते सुजाता आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धी वृद्धाश्रम येथे धान्य वाटप व फळवाटपाचा कार्यक्रम संपन्न

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा:

पुणे ( हडपसर) : आयकॉन युवा नेते सुजाता आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी पुणे शहर व हडपसर विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर येथील सिद्धी वृद्धाश्रम येथे धान्यवाटप व फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा उपक्रम समाजातील वंचित घटकांसाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव व्यक्त करणारा ठरला.

कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष अरविंद तायडे, उपाध्यक्ष जॉर्ज मदनकर, राजा ढाले साहेब, संघटक सतीश साबळे, सचिव प्रा. सावळे सर, सहसचिव पितांबर धीवार, वाघमारे साहेब, विधानसभा अध्यक्ष दिलीप क्षेत्रे, कोरबू साहेब, उपाध्यक्ष अमित कांबळे, दिपक गायकवाड, मिलिंद सरोदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पितांबर धीवार यांनी केले, तर प्रा. सावळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सतीश साबळे यांनी आपल्या प्रेरणादायी शब्दांत कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय शुभेच्छा अरविंद तायडे यांनी दिल्या, तर आभार प्रदर्शन मिलिंद सरोदे यांनी केले.

या उपक्रमात सिद्धार्थ मामा झेंडे, सचिन जगताप, भीमराव गोरे, सचिन कुचेकर, किरण आल्हाट, मेजर समता सैनिक दलाचे आशिष आल्हाट यांसह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सुजाता आंबेडकर यांच्या कार्याचे कौतुक करत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. वृद्धाश्रमातील नागरिकांनी कार्यक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.

वंचित बहुजन आघाडीची सामाजिक बांधिलकी व जबाबदारी जपत राबवलेला हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

संपादक: विजयसिंह गायकवाड

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button