Uncategorized

कोंढव्यामध्ये स्पेशल मसाज देणाऱ्या स्पा सेंटरची चर्चा, पोलिसांची धाड

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा:

कोंढवा : पुण्यामधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. कोंढवा परिसरामध्ये असणाऱ्या स्पा सेंटरवर वेगळेच उद्योग सुरू होते. परदेशी तरूणी असल्याने ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली होती.

पोलिसांना या स्पा सेंटरची माहिती मिळाल्यावर त्यांनी धाड मारली. त्यावेळी हा सर्व प्रकार समोर आला असून पोलिसांसाठी गुन्हा दाखल केला आहे. स्पा सेंटर इतके दिवस कोणाच्या वरदहस्ताने सुरू होते का याचा तपास पोलीस करत आहेत.

स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार कोंढवा परिसरात उघडकीस आला. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक विभागाने कारवाई करून परदेशी तरुणीसह तिघींची सुटका केली. यात स्पा सेंटरचा व्यवस्थापक आणि मालकावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिव राजेश भोसले (वय २१, रा. एनआयबीएम रोड), निखिल राजेंद्र नाईक (२६, रा. फुरसुंगी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी महिला सहायक उपनिरीक्षक छाया जाधव यांनी तक्रार दिली आहे. सुटका केलेल्या तिघीची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. पोलिसांनी स्पा सेंटरमधून मोबाइल आणि इतर साहित्य असे ७६ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button