Uncategorized
एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने केली रद्द

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा
पुण्यात 27 वर्षांपूर्वी एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केली. आरोपी भागवत काळेला पुणे सत्र न्यायालयाने फाशी सुनावली होती.
त्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य सरकारने अपील केले होते. हे अपील उच्च न्यायालयाने फेटाळले. फाशी सुनावण्याइतपत सबळ पुरावेच नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. पुणे सत्र न्यायालयाने 14 डिसेंबर 2021 रोजी भागवतला फाशी सुनावली होती. ती फाशी उच्च न्यायालयाने रद्द केली आणि भागवतला तातडीने तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले. रमेश पाटील व पत्नी विजया व दोन मुलांची हत्या झाली होती.