भूम परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात म्हशीचे रेडकू ठार नागरिकांना सतर्क राहण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यवंशी यांचे आव्हान

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
भूम:पोलीस ठाणे भूम हद्दीत MIDC भूम समोरील ओम पिसाळ यांच्या गाईच्या गोट्यामध्ये बिबट्या सदृश्य प्राण्याने एका जनावरांवर जोरदार हल्ला केल्याने एक म्हशीचे रेडकू ठार झाले आहे
तरी भूम परिसरातील आसपासच्या गावांमधील सर्व नागरिकांनी सतर्क रहावे आपआपले जनावरे व पाळीव प्राणी यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे
विशेषता नवलगाव, वारेवडगाव, कासारी भोगलगांव चुंबळी बऱ्हाणपूर, उळूप चिंचोली गावातील नागरिकांनी सतर्क रहावे या गावाच्या हद्दीमध्ये बिबट्याचा वावर असल्याने सर्व नागरिकांनी सावध राहावे.
तसेच ओम भूम तालुका हद्दीतील सर्व नागरिकांनी घरातील लहान मुलांची व वयोवृद्ध नागरिकांची काळजी घ्यावी आणि सदैव सतर्क राहण्याचे आव्हान भूम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी केले आहे
सदरची बातमी सुकटा बिट अंमलदार देवकर यांनी प्रसिद्धीस दिली.