Uncategorized

भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं पहाटे अपहरण

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा :

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं पहाटे अपहरण करण्यात आले आहे. सतीश वाघ असं टिळेकरांच्या मामाचे नाव आहे. अपहरणाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या घटनेनंतर पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश सातबा वाघ यांचे आज पहाटे पुण्यातून अपहरण करण्यात आले. सतीश वाघ हे मांजरी परिसरात राहण्यासाठी आहेत. आज पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते. घरापासून काही अंतरावर जातात दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांना जबरदस्तीने एका चार चाकी गाडीत बसवले आणि अपहरण करून घेऊन गेले.

पुण्यात मोठी खळबळ

सतीश वाघ हे शेतकरी आहेत..आमदार योगेश टिळेकर यांचे ते सख्खे मामा आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या मामाचे अपहरण करण्यात आल्याने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.. गुन्हे शाखा आणि पोलिसांची पथके या आरोपींचा शोध घेत आहे..

गाडी वेगाने सोलापुरच्या दिशेने गेली

या गाडीत चौघे जण असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. ही गाडी सोलापुरच्या दिशेने गेली असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं आहे. वाघ यांच्या मुलाने अपहरणाची तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावर तपास अधिकारी व पथक तपास करीत आहेत. तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button