Uncategorized

Murder: आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचं सकाळी अपहरण, नंतर खून, संध्याकाळी सापडला मृतदेह; पुण्यात खळबळ

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा :

 पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरणामुळे पुण्यात खळबळ उडाली होती. ज्याची भीती होती तीच बातमी आता समोर आली आहे.

यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिंदवणे घाटामध्ये सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे. आज पहाटे त्यांचं अपहरण झालं होतं. संध्याकाळी त्यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश सातबा वाघ यांचं आज पहाटे पुण्यातून अपहरण करण्यात आलं होतं. सतीश वाघ हे मांजरी परिसरात राहण्यासाठी आहेत. आज पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते. घरापासून काही अंतरावर जातात दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांना जबरदस्तीनं एका चार चाकी गाडीत बसवलं आणि अपहरण करून घेऊन गेलं.

संध्याकाळी ग्रामीण पोलिसांना यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाघ यांचा मृतदेह आढळून आला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बातमीला दुजोरा दिला आहे. सकाळपासून

पोलिसांच्या पाच तुकड्या तयार करण्यात आल्या. पोलिसांनी कसून चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासलं अन् आसपासच्या लोकांची चौकशी केली. घरगुती वाद, प्रोपर्टी वाद अशा अनेक अँगलने पोलिसांनी तपास केला. मात्र, एकही हिंट पोलिसांना मिळत नव्हती. पोलिसांना हाती काहीही लागत नव्हतं. अमितेश कुमार यांनी स्वत: तपास केंद्रावर मार्गदर्शन केलं पण दिवस अखेर पोलिसांच्या हाती काहीही लागलं नाही. अखेर पुण्यापासून 34 किलोमीटर लांब असलेल्या यवत गावात त्यांचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम वाघ यांचा शोध घेत होते. खुद्द अमितेश कुमार हे हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दिवसभर बसून होते. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. पण दिवसभरात वाघ यांचा काहीच ठिकाणा लागला नाही. संध्याकाळी ग्रामीण पोलिसांना वाघ यांचा मृतदेह आढळून आला. वाघ यांचं अपहरण का करण्यात आला, त्यांची अपहरणकर्त्यांनी हत्या का केली, याचं गुढं वाढलं आहे. विधान परिषदेच्या आमदाराच्या मामाचं अपहरण आणि हत्येमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

कोण होते सतीश वाघ?

सतीश वाघ हे शेतकरी होते. आमदार योगेश टिळेकर यांचे ते सख्खे मामा होते. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वाघ यांचं अपहरण करताना एका व्हिडीओ समोर आला आहे. एका गाडीत चौघे जण असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. ही गाडी सोलापुरच्या दिशेने गेली असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं आहे. वाघ यांच्या मुलाने अपहरणाची तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button