Uncategorized

” पोर्शे कार अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहूयात”, पाहा जयंत पाटलांनी काय केलं?

दिपसागर न्यूज पोर्टल ऑनलाइन सेवा:

पुणे वडगाव शेरी :”माझं काय म्हणणं आहे, सत्कार वगैरे नको, त्या पोर्शे कार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांना श्रद्धांजली वाहूयात, सत्कार बंद करा” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्कार नाकारला

जयंत पाटील यांची शुक्रवारी बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ धानोरी परिसरात जाहीर सभा होती. जाहीर सभेतच हा संपूर्ण प्रकार घडला. पोर्शे कार अपघात प्रकरणातील बळींना श्रध्दांजली वाहण्यासाठी जयंत पाटील यांनी स्वतःचा सत्कार बाजूला ठेवला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते.

या सभेत जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा पोर्शें कार अपघात प्रकरणावरून आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. एखादा आमदार गरिबासाठी राबला तर त्याचे कौतुक होते. मात्र इथले आमदार श्रीमंतांच्या मुलाचे सुचली पुरवण्यासाठी रात्रभर नोकरासारखे दाबले असे म्हणत त्यांनी पोर्शें प्रकरणावरून आमदार टिंगरे यांच्यावर निशाणा साधला.

आपल्या घणाघाती भाषणात जयंत पाटील म्हणाले, “विकास करणारा आमदार हवा कि विनाश करणारा आमदार हवा. हे तुम्ही राज्याला दाखवून दिले पाहिजे. बापूसाहेब पठारे हे एक कर्तबगार उमेदवार आहेत.

त्यांनी वडगावशेरीतील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. त्यांच्या रुपाने वडगावशेरीत विकासाचे नवे पर्व सुरू होईल. असा दमदार उमेदवार विधानसभेत गेला पाहिजे.”

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button