Uncategorized

गुजराती EVM च्या विळख्यात अडकली महाराष्ट्राची लोकशाही ? अनेक मतदारसंघात मतमोजणीत मोठी तफावत

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:

मुंबई : महाराष्ट्राच्या इतिहासात सत्ताधारी महायुतीचे सर्वाधिक २८८ पैकी २३२ आमदार निवडून आले आहेत. यावरून आता महाराष्ट्रातील जनतेसह विरोधकांनीही ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.

अशातच विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएममधून बाहेर आलेले आकडे यात तफापत असल्याची बाब निदार्शनास आली आहे. ९२ मतदारसंघामध्ये २० नोव्हेंबरला ईव्हीएममध्ये झालेले मतदान आणि २३ नोव्हेंबरला त्याच ईव्हीएममधून बाहेर आलेले प्रत्यक्ष मतदान यामध्ये फरक असल्याचे दिसते. याबाबत लोकमतने बातमी दिली आहे.

राज्यातील ९५ विधानसभा मतदारसंघात मतदान आणि मतमोजणीच्या दरम्यान तफावत आढळून आली आहे. यात १९ मतदारसंघात ईव्हीएममध्ये जास्त मते आढळली आहेत. तर ७६ मतदारसंघात ईव्हीएममध्ये कमी मते आढळून आले आहे. बुथ पातळीवरील तपासणीत तफावत असलेल्या मतदारसंघांची संख्या आणखी वाढू शकते. तर १९३ मतदारसंघात फरक नाही. मतदान आणि मतमोजणीत एक सारखीच मते आहे. ईव्हीएम आकडेवारीत कोणताही फरक दिसून आला नाही.

गुजराती EVM च्या विळख्यात अडकली महाराष्ट्राची लोकशाही ? असे महाविकास आघाडीच्या ट्विटवर म्हटले आहे. आज कराड येथे आलो असता सामान्य नागरिकांनी विधानसभा निकालाबाबत शंका उपस्थित केली. एका बातमीचे कात्रण दाखवत निवडणूक आयोग खरंच निष्पक्ष काम करत होता का? असा प्रश्न सामान्य नागरिकांनी उपस्थित केला. निकाल प्रसिद्ध झाल्यावर लगेच फॉर्म 20 जाहीर करायला हवा होता, मात्र निवडणूक आयोग कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे की मतांची बेरीज बरोबर येत नाही?आयोगाचं सध्याचं वागणं लोकशाहीसाठी बरं नाही, हीच जनभावना आहे. असाही उल्लेख करण्यात आला आहे.

या मतदारसंघांत कमी मते..

अक्कलकुाव, नवापुर, साक्री, शिरपुरे, चोपडा, भुसावळ, जळगाव शहर, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, अकोट, अकोला पश्चिम, मोर्शी, वर्धा, सावनेर, नागपूर मध्य, नागपुर पश्चिम, कामठी, आरमोरी, अहेरी, बल्लारपुर, चिमूर, वणी, नांदेड दक्षिण, मुखेड, कळमनुरी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी, घनसावंगी, बदनापुर, औरंगाबाद पश्चिम, गाणकापुर, नांदगाव, मालेगाव बाह्य, बागलाण, सिन्नर, निफाड, नालासोपारा, वसई, भिवंडी पश्चिम, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, कल्याण पुर्ण, कल्याण ग्रामीण, मीरा भाईंदर, ओवळा, कोपरी पाचपाखाडी, दिंडोशी, चारकोप, विर्लेपार्ले, चांदीवली, सायन कोळीवाडा, मुंबादेवी, पनवेल, कर्जत, अलिबाग, आंबेगाव, शिरूर, इंदापुर, बारामती, मावळ, कोथरूड, खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट, कोपरगाव, शेवगाव, लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, औंसा, तुळजापुर, माढा, सोलापुर शहर मध्य, कोल्हापुर उत्तर, खानापुर

या मतदारसंघांत जास्त मते…

आमगाव, उमरखेड, लोहा, देगलूर, हिंगोली, औरंगाबाद पुर्व, वैंजापूर, मालेगाव मध्य, कळवण, चांदवड, दिंडोरी, बोईसर, भोसरी, परळी, करमाळा, सोलापुर दक्षिण, कागल, कोल्हापुर दक्षिण, हातकणंगले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button