धनकवडीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने टाकला छापा 10 जणांवर गुन्हा दाखल

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
पुणे:धनकवडी भागातील नसरवान पेट्रोल पंपाजवळ बेकायदेशीर त्या मटका अड्डा सुरू असल्याची माहिती दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकत आरोपींकडून २२ हजार रुपयांची रोकड, मोबाइल संच, जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस शिपाई श्रीकांत दगडे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानंतर दहा जणांविरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अजय शिरसाठ (वय ४८, रा. धनकवडी ), किरण किसन कानकर (वय ३२, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी ), गणेश कदम ( वय ३५, रा. पद्मावती), दीपक दोडे ( वय ५५, रा. बिबवेवाडी ), दादासाहेब जोगदंड (वय ३५,रा. पद्मावती ), बसू सिगली (रा. मार्केट यार्ड ), अर्जुन थोरात ( वय ४९, रा.धनकवडी), बबन कांबळे (वय ५२, रा. बिबवेवाडी ), उत्तरेश्वर साठे (वय ५५, रा. आंबेगाव ), चंद्रकांत बाड (वय ३५, रा. धनकवडी ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी अवैध धंदे जोरात सुरू असून स्थानिक पोलीसस्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
या भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याचे पेव फुटले असल्याने सहकारनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सक्तीने हप्ते वसुली करत आहेत सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैद्य धंद्यावाल्यांना पोलीस स्टेशनचे पाठबळ मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे
सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकूण किती अवैद्य धंदे आहेत व ते कोठे आहेत ते प्रत्येक महिन्याला किती हप्ता पोलीस स्टेशनला देत आहेत याबाबत वाचा सविस्तर तपशील पुढील बातमीमध्ये.