Uncategorized

भाजपची मोठी कारवाई 40 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

दिपसागर न्युजऑनलाइन पोर्टल सेवा:

भाजपने बंडखोर पदाधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. पक्षादेश न पाळणाऱ्या जवळपास चाळीस बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांचा देखील समावेश आहे.

यामध्ये लिहिलं आहे की, ‘आपण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असून पक्षशिस्त व अनुशासन भंग करणारे कृत्य केले आहे. आपली ही कृती पक्ष अनुशासन भंग करणारी असून आपल्याला तात्काळ पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे.’ यामध्ये विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात भाजप महायुतीतील मित्र पक्षांसह विधानसभा निवडणुकीला सामोरा जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिंदेच्या शिवसेनेशी वाद आहेत.

तसंच अनेक इच्छुकांना मित्र पक्षांमुळे आपल्या उमेदवारीवर पाणी सोडावं लागलं आहे. त्यामुळे काहींनी उघड नाराजी बोलून दाखवली तर काहींनी थेट बंडखोरी केली. मात्र, ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते.

त्याच पार्श्वभूमीवर आता जवळपास चाळीस बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील मुख्य कार्यालयातून याबाबतचे पत्रक जाहीर करण्यात आले आहे.

यामध्ये लिहिलं आहे की, ‘आपण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असून पक्षशिस्त व अनुशासन भंग करणारे कृत्य केले आहे. आपली ही कृती पक्ष अनुशासन भंग करणारी असून आपल्याला तात्काळ पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे.’ यामध्ये विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

हकालपट्टी केलेले पदाधिकारी –

आश्विन सोनवणे गजानन महाले नागेश घोये तुषार भारतीय जगदीश गुप्ता प्रमोद सिंह गडरेल सोमदत करंजेकर शंकर महावी बिजभूषण पाझारे वसंत वरजुरकर राजू गायकवाड़ अतेशाम अली भाविक भगत नटवरलाल उतवम वैशाली मिलिंद देशमुख मिलिंद उत्तमराव देशमुख दिलीप वैकटराव कंदकुर्त सुनील साहेबराव मोरे संजय घोगरे सतीश जगनायराव घाटगे अशोक पांगारकर सुरेश सोनवणे एकनाथ जाधव कुणाल शिवाजी सुर्यवंशी आकाश साळुंखे जयश्री गरुड हरिष भगत स्नेहा देवेंद्र पाटील वरुण सदाशिव पाटील गोपाळ जव्हेरी धर्मेंद्र गोपीनाथ ठाकूर दिलीप विठ्ठल भोईर बाळासाहेब मुरकुटे शोभा बनशेट्टी सुनिल बंडगर सुवर्णा पाचपुते विशाल प्रभाकर परब

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button