Uncategorized

अटक न करण्यासाठी लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक गजाआड

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा:

पुणे : कोलकत्ता ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांनी काढलेल्या वॉरंटमध्ये तक्रारदार व त्यांचा मुलगा यांना अटक न करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाचेची मागणी करुन १० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाचा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शरद दशरथ कणसे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. शरद कणसे याला अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार व त्यांचा मुलगा यांच्या विरुद्ध कोलकत्ता ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांनी वॉरंट काढले आहे. हे वॉरंट बजावणीकामी हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शरद कणसे याच्याकडे देण्यात आले होते. या वॉरंटमध्ये तक्रारदार व त्यांचा मुलगा यांना अटक न करण्यासाठी शरद कणसे याने २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील ५ हजार रुपये अगोदरच घेतले होते. उर्वरित लाचेच्या रक्कमेसाठी तगादा लावून वारंवार अटक करण्याची धमकी देत असल्याबाबतची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती.

तक्रारदार यांच्या तक्रारीची गुरुवारी पडताळणी करण्यात आली.
त्यात शरद कणसे याने तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर हडसर पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला.
तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपये स्वीकारताना शरद कणसे याला ताब्यात घेण्यात आले.
त्याचेविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे , अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक अमोल भोसले अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button