Uncategorized

तुळजापूर बस डेपोतील कंडक्टरची मनमानी व दादागिरी प्रवाशांबरोबर करत आहेत उद्धट व गैरवर्तणूक

डेपो मॅनेजर यांच्याकडून अद्याप कोणत्याही ठोस कारवाई नाही

दिपसागर न्यूज ऑनलाइन सेवा पोर्टल

धाराशिव :तुळजापूर एसटी डेपो मधी बेजबाबदार महिला कंडक्टर एस के शेख हे सोलापूर ते तुळजापूर गाडी क्रमांक एम एच 20 -BL3527 या गाडीचे रविवारी कंडक्टर म्हणून ड्युटी करत असताना त्यांनी  दिपसागर न्यूज च्या प्रतिनिधीशी गैरवर्तणूक करून उलट सुलट उत्तरे देऊन अपमानास्पद वागणूक दिली आहे ते ड्युटीवर असताना कर्तव्य पार पाडत असताना त्यांना कुठलेही  सामाजिक भान नसल्याचे दिसून आले आहे

जर पत्रकाराला सामाजिक कार्यकर्त्याला लोकप्रतिनिधीला या महिला कंडक्टर कडून आशी वागणूक मिळत असेल तर सामान्य प्रवाशांना कशी वागणूक मिळत असेल याचा विचार न केलेलाच बरा

याउलट एसटी महामंडळ माझ्याच मालकी हक्काचे आहे आणि एसटी माझीच आहे अशा तोऱ्यात वागत असून त्यांनी  अनेक प्रवाशांबरोबर उर्मट व उद्धटपणे गैरवर्तणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे  ज्येष्ठ नागरिकांना देखील अरे तुरे अशी एकरी शब्दात भाषा वापरून एसटीमध्ये अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे प्रवासी सांगत आहेत  त्यांनी अनेक प्रवाशांचे वारंवार हाल केले आहेत असे देखील स्थानिक नागरिक सांगत आहेत त्यामुळे त्यांच्यावर वरिष्ठ डेपो मॅनेजर काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

महिला कंडक्टर एस के शेख हे वैद्यकीय सक्षम नसून ते अनफिट आहेत त्यांच्या मनावर काहीतरी परिणाम झाल्यासारखे ते प्रवाशांबरोबर बोलत आहेत असे प्रवासी दिपसागर न्यूज च्या प्रतिनिधीशी बोलत होते

जरी महिला वैद्यकीय सक्षम नसेल तर या महिलेला राज्य परिवहन एसटी महामंडळ मध्ये सेवेत घेतले कसे याचे देखील चौकशी होणे गरजेचे या  महिला कंडक्टरने कंडक्टर भरती होताना कोणकोणते कागदपत्र जोडले होते व भरती कशी झाली याची देखील सखोल चौकशी करण्याची मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते करत आहेत

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देखील त्यांनी एकेरी भाषेमध्ये वक्तव्य करून एकनाथ शिंदेला लावू का फोन आता असे दिपसागर च्या प्रतिनिधी बरोबर बोलून बेताल वक्तव्य महिला कंडक्टर एस के शेख यांनी केले  एकनाथ शिंदेने आमच्यासाठी व आमच्या महामंडळासाठी काय केले काय योगदान आहे आमचे महामंडळ वेगळेच आहे महाराष्ट्र सरकारचे महामंडळ नाही त्यामुळे आम्ही कुणाला ओळखत नाही आणि आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही मी 30 वर्षापासून नोकरी करत आहे माझे वरिष्ठ देखील मला काही करू शकत नाहीत असे म्हणून पत्रकारांबरोबर उद्धट आणि उर्मटपणे वर्तन केले

तुळजापूर येथे मोठ्या प्रमाणात आई तुळजाभवानी माता  यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून लांब लांबून भक्त  सोलापूर ते तुळजापूर धाराशिव ते तुळजापूर असा प्रवास करतात परंतु अशा आडमुठपणाच्या महिला  कंडक्टर मुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे या महिला कंडक्टर विरुद्ध दिपसागर न्यूज चे प्रतिनिधी यांनी डेपो मॅनेजर रामचंद्र शिंदे यांच्याकडे तात्काळ तक्रार केली असून अद्याप या महिला कंडक्टर वरती कुठल्याही प्रकारची कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात आली नाही

प्रवाशाच्या खिशातूनच या कंडक्टरची पगार होत आहे हा देखील विसर महिला कंडक्टर एस के शेख यांना  पडला असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अशा महिला कंडक्टर मुळे तुळजापूर एसटी डेपो चे नाव खराब होत आहे

महिला कंडक्टर एस के शेख यांच्या आशा बेजबाबदार वागणुकीमुळे तुळजापूर एसटी डेपोची प्रतिमा मलिन होत असून  प्रमाणिकपणे काम करणाऱ्या कंडक्टरला देखील अशा गैर कृत्यामुळे व शेख यांच्या वागणूक मुळे पुढील काळात मान खाली घालावा लागल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तुळजापूर एसटी डेपोतील वरिष्ठ अधिकारी डेपो मॅनेजर रामचंद्र शिंदे हे या महिला कंडक्टर एस के शेख यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करतील का? हे पाहणे गरजेचे आहे

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button