Uncategorized

पोर्शे कार अपघात प्रकरणातील डॉ. तावरे अन् डॉ. हळनोर यांच्याविरुद्ध खटला चालविण्यास राज्य शासनाची मंजुरी

कल्याणी नगर अपघात प्रकरणात ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ.अजय तावरे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेले मंजुरी पत्र विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी गुरुवारी दाखल केले.

डॉ. तावरे, डॉ. हळनोर, घटकांबळे हे शासकीय कर्मचारी असल्याने, त्यांच्याविरोधात फौजदारी खटला चालविण्यास परवानगी मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी  फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९७ प्रमाणे राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर आता राज्य शासनाने आरोपींविरोधात फौजदारी खटला चालविण्यास मंजुरी दिली आहे.

या अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अगरवाल  याच्या मुलासह दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी  ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ.अजय तावरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button