Uncategorized

मांजरी बुद्रुक:पुणे-सोलापूर महामार्गावर १३ लाखांची रोकड जप्त

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा ;

हडपसर, : येथील विधानसभा मतदारसंघ हद्दीतील द्राक्ष संशोधन केंद्रासमोर स्थिर सर्वेक्षण पथकाकडून एका वाहनातून आणली जाणारी सुमारे १३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. स्थिर सर्वेक्षण पथकाकडून पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी पथकाला एका क्रेटा वाहनात १२ लाख ९९ हजार ५०० रुपये आढळून आले.

वाहनातील वसीऊल्ला वलीउल्ला खान याला या रकमेबाबत पथकाने विचारणा केली असता त्याने ही रक्कम आपल्या भंगार व्यवसायाची असल्याचे सांगितले. मात्र, त्याबाबत तो कोणतीही कागदपत्रे सादर करू शकला नाही. त्यामुळे पथकाने सदर रकमेचा पंचनामा करून गुन्ह्याची नोंद केली. जप्त केलेली रक्कम आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे हस्तांतरात करण्यात आली असून हडपसर पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button