लाखो रुपयाचे मोठे कर्ज तात्काळ मंजूर आणि सरकारी योजनेच्या कर्जाला मात्र सरकारी काम आणि सहा महिने थांब बँक ऑफ महाराष्ट्र चा अजब कारभार

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा;
पुणे कोंढवा: बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लुल्लानगर या शाखेमध्ये शाखा व्यवस्थापक अमृता सागर यांच्याकडून मोठ-मोठे लाखो रुपयांचे कर्ज तात्काळ मंजूर केले जाते परंतु केंद्र शासनाने व महाराष्ट्र शासनाने संयुक्तपणे राबवलेल्या व पुरस्कृत केलेल्या आर्थिक कल्याणकारी योजने अंतर्गत आलेले कर्ज प्रकरण एक वर्षे प्रलंबित ठेवून त्या कर्ज प्रकरणाच्या नावाखाली संबंधित सुशिक्षित बेरोजगार यांची मानसिक व शारीरिक छळवणूक व पिळवणूक करून शासनाच्या आर्थिक योजनेच्या लाभापासून वंचित करून बँकेमध्ये सहा सहा महिने चकरा मारायला लावून शासनाच्या आर्थिक कल्याणकारी योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ केली जात आहे
त्यामुळे सरकारी काम आणि सहा महिने थांब याच वाक्याची प्रचिती या सुशिक्षित बेरोजगारांना आली आहे
संकेत दिलीप नळे या लाभार्थ्यांनी पी एम ईजी पी या योजने अंतर्गत गेले दीड वर्षांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लुना नगर या शाखेमध्ये कर्ज प्रकरण प्रस्ताव पाठवला होता ते कर्ज प्रकरण प्रस्ताव गेले एक वर्षापासून शाखा व्यवस्थापक यांच्याकडून प्रलंबित ठेवून उडवा उडवी चे उत्तरे देऊन नियमबाह्य कागदपत्राची मागणी करून रिझर्व बॅंकेच्या व केंद्र शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून मनमानी करून गेले एक वर्षापासून कर्ज प्रकरण बँकेमध्ये ठेवून त्या सुशिक्षित बेरोजगार यांना वेठीसी धरून स्वतःच्या आर्थिक हितापोटी जाणीवपूर्वक कर्ज प्रकरण वितरण करण्यास टाळाटाळ करून ते कर्ज प्रकरण प्रलंबित ठेवून या सुशिक्षित बेरोजगाराला त्याच्या आर्थिक व सामाजिक विकासापासून वंचित करण्याचे कटकारस्थान बँक ऑफ महाराष्ट्र लुल्लनगर शाखा चे शाखा व्यवस्थापक अमृता सागर व त्यांचे इतर सहकारी करत आहेत
विशेष म्हणजे या लाभार्थ्याला ऑनलाइन कर्ज मंजुरी देऊन तिन महिने झाले तरी देखील कर्ज प्रकरण वितरण करण्यास जाणीवपूर्वक नाहक त्रास देऊन कर्ज प्रकरण वितरण करण्यास टाळाटाळ करीत आहे आणि लाखो रुपयांचे मोठ-मोठे कर्ज तात्काळ मंजूर करून गोरगरीब शोषित पीडित सुशिक्षित बेरोजगार यांना केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक कल्याणकारी योजनेपासून वंचित करण्याचा कुटीर डाव बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लुल्लानगर या शाखेचे शाखा व्यवस्थापक अमृता सागर हे करत आहे.
अमृता सागर यांना या लाभार्थ्याकडून कुठलेही कमिशन मिळत नसल्याने हे शाखा व्यवस्थापक जाणीवपूर्वक कर्ज प्रकरण वितरण करण्यास टाळा करत आहेत अशा प्रकारे शाखा व्यवस्थापक त्रास देत असल्याने या लाभार्थ्याने त्यांचे वरिष्ठ पुणे पूर्व अंचल प्रमुख सुशांत कुमार गुप्ता यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे परंतु वरिष्ठांकडून देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही याउलट असे गैरकृते करणाऱ्या शाखा व्यवस्थापकाला पाठीशी घालून मोठमोठे कर्ज वितरण करण्यास पाठबळ दिले जात आहे आणि गोरगरिबांना सुशिक्षित बेरोजगारांना फक्त बँकेमध्ये चकरा मारायला लावून प्रकरणाच्या नावाखाली वरिष्ठ अधिकारी व शाखा व्यवस्थापक यांच्याकडून छळवणूक व पिळवणूक केली जात आहे
पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे व जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक तसेच जिल्हा अग्रणीय बँकेचे एल डी एम यांनी अशा गैर कृत्ये करणाऱ्या व मनमानी करणाऱ्या शाखा व्यवस्थापकावर कठोर कारवाई होण्याकरित ठोस पावले उचलणे आवश्यक आहे आणि प्रलंबित असलेल्या कर्ज प्रकरणाकडे स्वतः लक्ष घालून सुशिक्षित बेरोजगारांना केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक कल्याणकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यास सदैव प्रयत्नशील राहिले पाहिजे परंतु असे होताना दिसून येत नाही त्यामुळे बँकेच्या मनमानी पणामुळे सुशिक्षित बेरोजगार यांना आर्थिक योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे