Uncategorized

खेड शिवापूर पाठोपाठ पुण्यातही कारमध्ये सापडले 22.5 लाख रुपये

विधानसभा निवडणुकीचा माहौल अजून सुरु होत असताना एका पाठोपाठ एक असे लाखो रुपयांची वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे. खेड शिवापूर येथे एका कारमध्ये ५ कोटी रुपये सापडल्यानंतर आज पुण्यात एका कारमध्ये २२ लाख ५० हजार रुपयांची रोकड आढळून आली आहे.

पुणे सोलापूर रोडवर हडपसर परिसरात लावलेल्या नाकाबंदीमध्ये संशयास्पद वाटणार्‍या गाड्यांची तपासणी केली जात होती. यावेळी एका कारमध्ये २२ लाख ५० हजार रुपयांची रोकड आढळून आली़ ही रोकड एका व्यापार्‍याची असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी याची प्राप्तिकर अधिकारी, निवडणुक अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button