Uncategorized
भीमराव तापकीर, हेमंत रासने, सुनील कांबळे यांना पुन्हा भाजपची उमेदवारी

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा :
भारतीय जनता पार्टीने २२ उमेदवारांची नावे असलेली दुसरी यादी आताच जाहीर केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचे नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत काही विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. खडकवासल्याचे भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर , पुणे कॅन्टोन्मेंट चे विद्यमान आमदार सुनील कांबळे आणि कसब्यात गेल्या पोटनिवडणुकीत पराभूत झालेले हेमंत रासने यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.पण या घोषणेनंतर मतदारसंघांमध्ये महायुतीमधील अंतर्गत कलह उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहे
भाजपची दुसरी यादी