Uncategorized

आरपीआय (निकाळजे गट ) पुणे जिल्हातील 21 विधानसभा मतदारसंघात 13 जागेवर पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवाराची संधी

पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन खरात यांनी जाहीर केली इच्छुक उमेदवारांची यादी

 

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा:

पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे. तर  २२ तारखेपासून उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर  विधानसभा निवडणुकीच्या मैदानात सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे  एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला 288 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे

सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादींची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. पक्ष आपआपले उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन  पार्टी ऑफ इंडिया (ए) राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील 13 मतदारसंघातील विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केले असून यामध्ये शिरूर मतदार संघातील राहुल जोगदंड हे देखील इच्छुक आहेत असे पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार असलेल्या इच्छुक उमेदवाराची यादी

1) पुरंदर –            विनोद मोहन धेंडे
2) पुणे कँटोन्मेंट –  प्रियदर्शनी प्रकाश निकाळजे
3) पिंपरी . –          नितीन शाहुराव जोगदंड
4) भोर –             सिद्धार्थ भिकाजी गायकवाड
5) बारामती . –     अमोल कांतीलाल साबळे

6) दौंड. –               संदीप विक्रम आढाव
7) पर्वती . –            रवींद्र शरद क्षीरसागर
8) शिवाजी नगर –    डोर्थी विल्सन थॉमस
9) वडगाव शेरी –     अशोक वामनराव जगताप
10) कोथरूड. –      अनिल पांडुरंग चव्हाण
11) हडपसर –         कृष्णा प्रका श कदम
12) खडकवा सला – नवनाथ मारुती नेटके
13) शिरूर. –           राहुल प्रकाश जोगदंड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button